बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना आपला पिछा सोडणार नाही, त्यामुळे…’; पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

गोवा | अभिनेत्री पूजा बेदी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. सध्या पूजा बेदी आपल्या मुलांसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यान मुलांसोबत धमाल करतानाचा एक व्हिडीओ पूजाने तिच्या इंस्टाग्रान अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे.

कोरोना व्हायरस कित्येकवर्ष आपला पिछा सोडणार नाही. त्यामुळे आता आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागणार आहे, असं पूजाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. पूजा बेदीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

कोरोनाला घाबरुन घरात बसून स्वतःचं आयुष्य असं वाया घालवू नका, काळजी जरुर घ्या, मास्क लावा पण भीतीपोटी घरातच अडकून पडू नका. मृत्यू यायचा असेल तर तो घरात बसूनही येतो. मृत्यूने गाठण्यापूर्वी आयुष्याचा पुरेपुर आनंद लुटा, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी टीका करतांना दिसत आहेत.कोरोनाची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढते. अशात सरकाराने खबरदारी म्हणून अनेक निर्बंध लावले आहेत.सर्वसमान्य जनतेचे कोरोनाने कंबरडे मोडलं आहे. अनेक सेलिब्रेटी इतर देशात इतर राज्यात व्हॅकेशनचा आनंद लुटताना दिसतायेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by POOJA BEDI (@poojabediofficial)

 

थोडक्यात बातम्या- 

‘अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात…’; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

दोन ‘कॅप्टन कुल’ मध्ये रंगणार सामना; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीच्या वाटणीवरुन वाद, एकाची हत्या

“इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?”

पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना सोडवायला दिलंय ‘हे’ कोडं; पाहा तुम्हाला सुटतंय का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More