बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी

जयपूर । राजस्थानच्या जयपूरमधील असलेल्या वैशाली नगरमध्ये एक अजब घटना घडली आहे. प्रसिद्ध हेअरप्लांट तज्ञ डॉ. सुनीत सोनी यांच्या घरात अगदी फिल्मी स्टाईलनी चोरी झाली आहे. 20 फूट लांब बोगदा बनवून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. चोरांनी यासाठी डॉक्टरच्या घराच्या मागच्या बाजूला 90 लाखात एक घर विकत घेतलं. त्यानंतर चोरट्याने 20 फूट बोगदा खोदला आणि डॉक्टरांच्या घरात शिरला.

डॉ. सुनीत सोनी यांनी बेसमेंटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चांदीचा साठा करून ठेवला होता. जवळपास तीन महिन्यांपूर्वी डॉ. सोनींनी 3 बॉक्समध्ये चांदी भरुन घरामध्ये पुरुन ठेवलं होतं आणि यावर फरशी बसवण्यात आली होती. बेसमेंटमधील चांदीचे बॉक्स गायब आहेत. हे समजल्यानंतर सोनी यांनी पोलिसांत याबद्दल तक्रार दाखल केली.

तपास केल्यानंंतर पोलिसांना घरामागील एका घराची फरशी काढून त्याद्वारे डॉक्टरच्या घरापर्यंत 20 फूटाचा बोगदा तयार करण्यात आला असल्याचं लक्षात आलं. चोर या बोगद्याद्वारे बेसमेंटपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तिन्ही बॉक्स गायब केले. जवळपास 400 किलो चांदी चोरी झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, सोनी यांनी पोलिसात केवळ दागिने गायब झाले असल्याची तक्रार दिली आहे.

पोलीस आता चोरांचा शोध घेत आहेत. ज्या घरातून बोगदा बनवण्यात आला ते घर 4 जानेवारीलाच एका व्यक्तीनं 90 लाखात विकत घेतलं होतं. या घटनेमध्ये 2 ते 3 लोकांचा समावेश असल्याचा अंदाज पोलीस लावत आहेत. घटनेत डॉक्टरच्या जवळच्या लोकांचाही हात असू शकतो असा संशय पोलिसांना आहे.

थोडक्यात बातम्या-चोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More