बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

मुंबई | शरद पवार सध्या मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलत असले तरी ते किती दिवस या मुद्द्यावर ठाम राहतील हे सांगता येत नाही. मी त्यांच्यासोबत काम केलंय त्यामुळे मला हा अनुभव आहे, असं माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी म्हटलंय. त्या टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केल्यानंतर शरद पवारांनी मला साथ दिली नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मला पक्षातून काढून टाकण्यात आलं, असं शालिनीताई म्हणाल्या.

दरम्यान, शरद पवारांनी त्यावेळी माझी साथ दिली असती तर मराठा समाजावर आज आंदोलन करण्याची वेळ आली नसती. असे जीव गेले नसते, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?

-मराठा समाजाच्या भावना लक्षात न घेणारं सरकार बालबुद्दीचं आहे; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

-साष्टांग दंडवत घालतो पण हा हिंसाचार थांबवा- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More