बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझा मुलगा 11 वर्षांचा असताना अचानक गेला, त्यावेळी फक्त शाहरूख खान…”

नवी दिल्ली | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ट्विटरवरही आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ट्रेंडिंग असल्याचं दिसून आलं. या प्रकरणामुळे आर्यनला पाठिंबा देणारा आणि आर्यन खानवर टीका करणारा असे दोन गट पडलेले दिसत आहेत. सोशल मीडियावर जरी चाहत्यांनी शाहरुख आणि आर्यन यांच्यावर टीका केली असली तरी बॉलिवूड सेलिब्रिटींनी मात्र शाहरुख खानला पाठींबा दिल्याचं दिसून आलं.

सुनिल शेट्टी, रविना टंडन, सलमान खान, फराह खान, पूजा भट्ट, ह्रतिक रोशन या बॉलिवूड कलाकारांनाही शाहरूख खानचा चिरंजीव आर्यन खानची बाजू सावरून धरल्याचं पहायला मिळालं. आता अभिनेता आणि निवेदक शेखर सुमन यानेही शाहरुख खानच्या समर्थनासाठी ट्विट केलं आहे. त्याने ट्विटमध्ये शाहरूखचं कौतूक केलं आहे, संकटाच्या काळात फक्त शाहरूखनेचं मला मदत केल्याचं शेखरने म्हटलं आहे.

शेखरने ट्विटमध्ये लिहीलं की, ‘माझा मोठा मुलगा 11 वर्षाचा असताना अचानक देवाघरी गेला. त्यावेळी मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मला आधार देणारा केवळ शाहरूखचं होता. बॉलिवूडचा एकमेव अभिनेता जो मला वैयक्तिक भेटायला आला आणि भेटून त्याने माझी विचारपूस केली. त्यामुळे पालकांसाठी असा परिस्थितीतून जाणं सोपं नसतं. मग ती घटना कोणतीही असली तरी’, अशा शब्दात शेखर सुमन याने शाहरुखचं कौतूक केलं आहे.

शेखर सुमनचं हे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. एकीकडे ट्विटरवर शाहरुखच्या निषेधार्थ ट्विट केले जात असतानाच बॉलिवूड कलाकार मात्र शाहरूख आणि त्याच्या कुटूंबियांसोबत खंबीरपणे पाठीशी असल्याचं पहायला मिळालंय. आर्यन खान सध्या कोठडीत आहे. त्याच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती. मात्र सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतल्याने ती सुनावनी बुधवार गेली आहे. त्यामुळे एकंदरीतच आर्यनच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

रकुल प्रीत सिंह करतीये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भन्नाट ऑफर! लस घेतली तर मिळणार ‘या’ गोष्टी मोफत

अजब! ‘पैसे नव्हते तर कुलूप कशाला लावलं’, चोरीनंतर चोराने लिहीलेल्या चिठ्ठीचीच सर्वत्र चर्चा

‘ही’ सरकारी कंपनी वाटणार मोफत सिमकार्ड; वाचा सविस्तर

“हे तर मुलांचं राज्य आहे, मुलींचा सन्मान यांची संस्कृती नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More