Top News देश

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार

तिरुवनंतपुरम | केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 38 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुलीचं वय 17 वर्ष असून जेव्हा या मुलीचं काऊंसलिंग सेशन सुरु होतं. त्यादरम्यान तिचं 38 जणांकडून लैंगिक अत्याचार झाली असल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे.

पीडितेसोबत लैंगिक अत्याचाराची पहिली घटना ही 2016 मध्ये झाली होती. तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती. त्यानंतर एका वर्षानंतर पुन्हा तिच्यासोबत हे राक्षसी कृत्य घडलं. दुसऱ्या घटनेनंतर तिला बाल गृहात पाठवण्यात आलं. त्यानंतर जवळपास वर्षभरानंतर तिला तिच्या आई आणि भावासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.

दरम्यान, अत्याचार केलेल्या 38 नराधमांविरोधात लैंगिक शोषणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यापैकी 33 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सध्या अटक केलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कारभारी लयभारी!; …म्हणून पत्नीनं आपल्या पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं!

धक्कादायक! लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

“स्वतःला जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष मोठा?; फायनल आकडे आले समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या