मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी अर्जुनने आयपीएलसाठी नोंदणी केली होती. 20 लाखांच्या मुळ किंमतीत त्याची नोंदणी झाली आहे. त्यानंतर कोणता संघ अर्जुनला घेईल याची चर्चा क्रिकेटविश्वात रंगली आहे.
21 वर्षीय अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. अर्जुनला 3 संघ घेण्यास तयार असतील. राजस्थान राॅयल्स संघात वेगवान गोलंदाजाची कमतरता आहे. संजू सॅमसन, जॉस बटलर, बेन स्टोक यांसारखे तगडे खेळाडू आहेत. राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापन अर्जुनला संधी देऊ शकतो.
मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्यानंतर फटकेबाजी करणारा अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. शिवाय अर्जुनचे वडिल सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स हा संघ देखील अर्जुनवर सर्वाधिक बोली लावू शकतो.
पंजाब संघाकडे सर्वाधिक 54 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. त्यामुळे किंग्ज ईलेवन पंजाब अर्जुनला संघात स्थान देऊ शकेल. संघाचा कर्णधार केएल राहुल युवा खेळाडूंना नेहमी संधी देत असतो. शिवाय किंग्ज ईलेवन पंजाबकडे अनिल कुंबळे सारखे प्रशिक्षक आहे. त्यामुळे किंग्ज ईलेव्हन पंजाब अर्जुनवर बोली लावू शकतात.
लिलावात अनेक दिग्गज खेळाडू सहभागी आहेत. स्टीवन स्मिथ, ग्लेन माॅक्सवेल,शाकिब अल हसन यांसारखे दिग्गज खेऴाडू असतील. यंदा आयपीएलचं 14 वा हंगाम आहे. या साठीचा लिलाव 28 फेब्रुवारीला चैन्नई येथे पार पडणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले’; दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी संतापल्या
140 किलो वजनाचा गोलंदाज सगळ्या बांगलादेशला पुरुन उरला, लावला धक्कादायक निकाल!
मालक दिलदार, कुत्रा मालामाल; बनला एका रात्रीत 36 कोटीचा मालक
पी. बी. सावंत कोण होते?, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्द
मराठी माध्यमातून शिक्षण, बीएमसीनं नोकरी नाकारली!; शिक्षक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
Comments are closed.