बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

6 महिन्यांच्या तीरा कामतला अखेर ‘ते’ 16 कोटींचं औषध मिळालं!

मुंबई | 6 महिन्यांच्या तीरा कामतला SMA या आजाराने ग्रासलं आहे. या आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत आहे तब्बल 16 कोटी रुपये आहे. हे औषध मागवण्यासाठी तीराच्या पालकांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर तीराला हे औषध मिळालं आहे. डॉक्टरांनी आज तीराला औषध दिलं आहे. तिला माहिमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलंय. तीराला शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचं कळतंय.

अमेरिकेतून तीराचं औषध गुरुवारी मुंबईतील रुग्णालयात पोहचलं. हे औषध देण्याचा परवाना हिंदुजा रुग्णालयाकडे आहे. त्यामुळे तेथून परवाना मिळाल्यानंतरच हे औषध तीराला सलाईनमधून देण्यात आलं. आता एक दिवस तिला रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

औषध मिळाल्याने ती लवकरच बरी होईल अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली. अनेकांनी तिची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्यात.

SMA या आजाराने ग्रासलेल्या 5 महिन्यांच्या तीरा कामतच्या मदतीसाठी आता राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकार देखील धावून आलं. केंद्र सरकाराने तीरासाठी लागणाऱ्या औषधांसाठीचा 6 कोटींचा कर माफ केला होता. त्यामुळे हे औषध भारतात आणण्यास मोठी मदत झाली.

स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या आजाराला मेडिकल टर्ममध्ये SMA म्हणतात. हा आजार एकप्रकारे जेनेटिक डिसिज अर्थात जनुकीय बदलांमुळे होणारा आजार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

थोडक्यात बातम्या-

…तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का?- उद्धव ठाकरे

भारताच्या पराक्रमी लेकीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ पदावर नियुक्ती

मोठी बातमी! 10 आणि 12 च्या बोर्डाच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर

‘तुम्ही कोणाचीही तोंड चिपकवा मला….;’ चित्रा वाघ आक्रमक

“श्रीदेवीनंतर सातत्याने विनोदी भूमिका साकारणारी बॉलिवूडची मी दुसरी अभिनेत्री”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More