बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाचे नियम पाळूच पण मूर्ती मात्र उंचच आणू”

मुंबई | कोरोनाच्या महामारीमुळं गेल्या वर्षीपासून राज्यभरात अगदी सण-उत्सवदेखील साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी गणेशोत्सवावर राज्य सरकारनं निर्बंध घातले होते. त्यात गणेशमुर्तींच्या उंचीवरही मर्यादा घालण्यात आली होती. अशातच यंदा गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींना उंचीची मर्यादा नसावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

10 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. अद्याप उत्सवाला अडीच महिने शिल्लक आहे. मात्र असं असलं तरी मंडप व सजावटीची तयारी आधीच सुरू होते. गेल्यावर्षी गणेशोत्सव मंडळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हे लक्षात घेत राज्य सरकार गणेशोत्सव मंडळांना मदत करण्यात भूमिकेत असेल आणि त्यादृष्टीने सरकार गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आणणार नाही, अशी अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई महानगरपालिका, पोलिस आणि गणेशोत्सव मंडळांची बैठक होणार आहे. या बैठकीत गणेशोत्सवाचे नियम, गणेशमुर्तीची उंची आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, यंदा गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्तींना उंचीची मर्यादा नसावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळले जातील, मात्र मूर्ती उचंच राहतील, याचा पवित्र्यामुळे ठाकरे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; किवींना विजयासाठी 139 धावांचं लक्ष्य

‘आता एवढा माज आला का?’; शहनाझचा ‘हा’ व्हिडीओ पाहून भडकले चाहते

‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; जि.प. पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! मानधनात वाढ आणि कोविड भत्ताही मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More