बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतिसुमनं, म्हणाले…’आता जवळ आल्यावर कळतंय ते कसे आहेत’

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या यादीत एकूण 3894 घरांच्या सोडतीची घोषणा झाली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांना पूर्वी टीव्हीवर बघायचो. तेव्हा ते काय बोलताय, कशासाठी बोलताय हे कळत नसायचं. आता जवळ आल्यावर ते कसे आहेत हे कळतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी गिरणी कामगारांमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. हे तुमचं ऋण आहे. त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. मी आज येथे तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच असेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

दरम्यान, ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. मला वचन द्या, यातील एकही घर विकायचं नाही. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

तुझी उंची किती आणि तू बोलतो किती; खोतकरांची निलेश राणेंवर बोचरी टीका

अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ- शरद पोंक्षे

महत्वाच्या बातम्या- 

एके काळी दगड खायचो, आता विरोधकांचं डिपाॅझिट जप्त करतो- नितीन गडकरी

…तर त्या शिवसैनिकाचं थोबाड फोडा; विनायक राऊतांची ताकीद

‘वचन द्या, तुम्ही एकही घर विकणार नाही’; उद्धव ठाकरेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More