नवी दिल्ली | देशात बऱ्याच ठिकाणी नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए), एनआरसी, एनपीआर या मुद्द्यांवरुन विरोध सुरु आहे. काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. यावर नागरिकत्व सुधारणा विधेयकाची बाजू मांडत, हिंदूंना इटली थोडीच स्वीकारणार आहे, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसवर केली आहे.
बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची आणि संरक्षण देण्याची जबाबदारी भारताची आहे. हिंदू जर भारतात येणार नाहीत तर त्यांचा स्वीकार इटली थोडीच करणार आहे, असा टोला किशन रेड्डी यांनी काँग्रेसला लगावला.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या इटलीच्या असल्यामुळे त्यांना या मुद्द्यावरुन वारंवार लक्ष केलं जात आहे. 1999 पासून सोनिया गांधी यांच्या इटलीच्या नागरिकत्वाचा मुद्दा राजकारणात समोर आला होता, तेव्हा पासून भाजप काँग्रेसवर या मुद्दावरुन टीका करत आली आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. मात्र, हा कायदा संविधानविरोधी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
चित्ररथ नाकारणे हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे- रुपाली चाकणकर https://t.co/jH9JcbCjJ7 @ChakankarSpeaks @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
अब्दुल सत्तारांचे दाऊदशी संबंध?? ‘सामना’तील ‘ती’ बातमी व्हायरल! – https://t.co/auJmPQd26s @ShivSena @uddhavthackeray #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
महाराष्ट्राचा चित्ररथ केंद्र सरकारने नाकारल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले… https://t.co/5YPnXRHdE9 @rautsanjay61 @BJP4Maharashtra @ShivSena @OfficeofUT #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 2, 2020
Comments are closed.