बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचे मांजर”

मुंबई | सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. र्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) ओबीसी उमेदवारांना 27 टक्के आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याचे चांगलेच पडसाद उमटत आहेत. यावरच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप करत भाजप आमदार गोपीचंद पळकर यांनी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष केल्याचं पहायला मिळालं.

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. आता राज्यातील ओबीसी मंत्री कुठं आहेत ते तर सर्व पवारांच्या ताटाखालचं मांजर झाल्याची खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना पाळल्या नसल्याचाही आरोप पळकरांनी केला आहे. त्याचबरोबर म्पिरिकल डाटा राज्य सरकारनं गोळा केला नाही. 18 महिन्य़ानंतर आगोयाची स्थापना करण्यात आली. ओबीसींनी काय करायचं? कुठे जायचं? असा सवालही पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेता इरफान खानच्या मृत्यूविषयी नसीरुद्दीन शाह यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट!

‘काही लाज उरली असेल तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा’; नितेश राणे संतापले

Omicron मुळे चिंता वाढली असताना WHO ने भारताला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला…

“स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षाचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More