बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकार विरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार? राऊतांनी दिली आतली बातमी

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या पुढाकाराने मोदी सरकारच्या विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसच्या आतली एक बातमी दिली आहे.

आज काँग्रेसच्या नेतृत्वाने एक संदेश दिला आहे. शरद पवार आणि राहुल गांधी एकत्र आले तर फायदा होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल 2 तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर राऊत माध्यमांशी बोलत होते.

तसेच राऊत यावेळी म्हणाले की, आज आम्ही एनडीए किंवा युपीए मध्ये नाही. सध्या दिल्लीत एक आघाडी स्थापन करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न दिसतोय. सध्या जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना विरोधी पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार साहेब काही भूमिका घेत असतील तर ती योग्य आहे.

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी प्रताप सरनाईकांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मनी लाँड्रींग प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला असून लवकरच बातमी कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘उद्धव ठाकरेंनी सरनाईकांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे’; संजय राऊतांचं सूचक विधान

“मंत्रिपदासाठी लाचार झालेला नेता आम्हाला नको”; रामदास आठवलेंना घरचा आहेर

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More