Top News जळगाव राजकारण

‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे

जळगाव | भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशांनंतर ते आज जळगावमध्ये परतले. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं कारण सांगितलं आहे.

खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, सरकारने मला विकास कामांसाठी मदत करावी या ही अपेक्षा घेऊन मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालोय.

“मुळात नाथाभाऊ हा स्वस्थ बसणारा नव्हता. असंख्य लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. जर तिकीट न देऊन घरी बसायची भाषा करत असाल तर मला ते अजिबात मान्य नाही. मी कोणत्याही पदाचा भुकेला नाही, कारण पदं मला अनेक येतात आणि जातात,” असंही खडसे म्हणालेत.

मुंबईत जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एखनाथ खडसे आज जळगावमध्ये परतलेत. यानंतर मुक्ताईनगरमध्ये त्यांचं कार्यकर्त्यांकडून अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या-

“…तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष होण्यास उशीर लागणार नाही”

कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके मुख्यमंत्री कोत्या मनाचे नाही- संजय राऊत

आरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…

चीनशी लढा देण्यासाठी आपल्याला ताकद आणखी वाढवावी लागणार- मोहन भागवत

“आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या