बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये”

मुंबई | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत होती. या प्रकरणाचा छडा फाॅरेन्सिक तपासातून झाल्याचा खळबळजनक दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेसह जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला होता. या साॅफ्टवेअरद्वारे भारतातील 300 हून अधिक लोकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचा खुलासा या वृत्तामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इस्त्रायली सॉफ्टवेयर पेगाससद्वारे केलेल्या गुप्तहेरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहिती आहे, असं ट्विट करत राहुल गांधी यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेगासस सॉफ्टवेअर प्रकरणात देशातील 30 पत्रकारांवर नजर ठेवली जात असल्याची माहिती समोर आली होती.

रविवारी रात्री हे प्रकरण समोर आलं होतं. थेट केंद्र सरकारवर टीका झाल्यानं केंद्रानं या प्रकरणावर तात्काळ उत्तर दिलं आहे. पत्रकार तसेच इतर भारतीयांच्या गुप्तहेरी केल्याच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलंय. भारतीय लोकशाहीत खासगीपणा हा एक अधिकार आहे. वृत्तसंस्थेने दिलेले वृत्त पुर्णपणे खोटं असल्यांचं सरकारने सांगितलंय.

दरम्यान, पेगाससच्या म्हणण्यानुसार ते आपलं सॉफ्टवेअर कुणाही ऐऱ्यागैऱ्याला विकत नाहीत. संबंधित देशाच्या मान्यताप्राप्त सरकारलाच विकतात. खुद्द भारत सरकारने ते विकत घेतलं आणि त्याचा वापर केला असा स्पष्ट निष्कर्ष निघतो. ज्या 40 देशांनी ते घेतलंय त्यांची नावं सांगायला मात्र ते तयार नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘महिला, दलित आणि शेतकरी मंत्री झालेले बघवत नाही’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदी आक्रमक

जिवंत असूनही अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा; तक्रार केल्यानंतर मिळालं हे अजब उत्तर

‘100 रूपये द्या आणि माझ्यासोबत सेल्फी घ्या’; भाजप नेत्याची भन्नाट आयडिया

‘सेल्फ केअरच्या नावाखाली स्वत:चं नुकसान करतोय’; अमिर खानच्या मुलीने केला मोठा खुलासा

तिखट आणि धारदार प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधी द्या- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More