CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

CBI संस्था संकटात; 3 राज्यांनी घातली बंदी, इतरही बंदीच्या तयारीत

नवी दिल्ली | सीबीआय प्रमुख आलोक वर्मा प्रकरणामुळे सीबीआय संस्थेच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थिती करत 3 राज्यांनी बंदी आणली आहे. तसेच इतर काही राज्येही बंदीच्या तयारीत आहे.

गेल्या वर्षी सर्वात प्रथम आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयच्या राज्यातील तपासाला बंदी घातली होती. पश्चिम बंगालनेही सीबीआयवर बंदी घालत या संंस्थेचा राजकारणासाठी उपयोग करण्यात येत असल्याचं म्हटलं होतं.

आता यात छत्तीसगड राज्याचीही भर पडली असून सीबीआयने तपास करावा तसेच छापा टाकावा याची परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्यामधील वादामुळे आणि त्यानंतरच्या सरकारच्या हस्तेक्षेपामुळे सीबीआयची प्रतिमा मलिन झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

-भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस

-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”

Google+ Linkedin