बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता तर ते दिसतही नाहीत’; बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर आता शिवसेना आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरेंनी दोन दिवसांपुर्वी नगरसेवकांच्या बैठकीत भाजप आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे गटाने डाव साधला, स्वार्थ साधला. शक्यतो अशी बंडे विरोधी पक्षातून सत्तेत जाण्यासाठी असतात परंतु हे बंड सत्तेतून विरोधी पक्षात जाण्यासाठी आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेनेने विविध ठीकाणी मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी एका मेळाव्यात बोलताना आदित्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. यापुर्वीच्या बंडाच्या आठवणी आपण आता पुसून टाकल्या आहेत. तसेच शिवसेनेतून घाण निघून गेली. आता तर ते दिसतही नाहीत. यापुढे जे व्हायचे ते चांगलेच होणार, असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंचे हे बंड काही महाराष्ट्रातील पहिलं बंड नाही. यापुर्वी बाळ ठाकरे यांच्या काळात देखील शिवसेनेत अशी बंड झाली होती. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी सुद्धा शिवसेना सोडली होती. ती ही बंड करत. परंतु त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर दावा केला नव्हता. एकनाथ शिंदेंचे बंड थोडं वेगळं आहे. त्यांनी शिवसेनेवर दावा केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने शिंदे गटाचं हे बंड मान्य केलं असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाईचं शस्त्र देखील उगारलं आहे. शिंदे गट आगामी मुंबई महामगरपालिका निवडणुकीला कसा सामोरा जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“देवा लवकर आटप रे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय”

“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”

‘आधी नाथ होते आता दास झालेत’, मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

मोठी बातमी! शिवसेनेला धक्का, शिंदे गटाचे नाव ठरले

बंडखोर आमदारांच्या कुटुंबांची सुरक्षा काढून घेताच एकनाथ शिंदे कडाडले

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More