बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले लाचखोरी आणि खोटे कागदपत्रे सादर करून मिळवलेली नोकरी. या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे आणि आरोप केले.

समीर वानखेडेंवर खंडणी आणि खोटे कागदपत्रे सादर करण्याच्या आरोपांच्या प्रकरणात आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे. समीर वानखेडेंच्या कागदपत्रासंदर्भात सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल, असं म्हणत अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नवाब मलिकांनी ट्विटर आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून समीर वानखेडेंवर आरोप करत मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली गेले काही दिवस हे प्रकरण चांगलंच गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावरून राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. त्यातच अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जातपडताळणी कायद्याप्रमाणे चौकशी केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यातच आता नवाब मलिक या संदर्भात तक्रार दाखल करणार का?, तसेच या प्रकरणी आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

 

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

“…तर येणाऱ्या काळात मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More