बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राने गरिबांच्या खात्यावर 1 लाख कोटी पाठवले- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  | आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. लखनऊ येथे ‘न्यु अर्बन इंडिया’ या थीम अंतर्गत तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश येथे योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. लोकांना संबोधित केलं.

उत्तरप्रदेश मधील लखनऊ येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तसेच शहरी विकास विभाग यांच्या तर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. उत्तरप्रदेशच्या योगी सरकारसोबतच केंद्र सरकारच्या कामाची देखील प्रशंसा मोदींनी केली आहे. केंद्राने सुमारे 1 लाख कोटी गरिबांच्या खात्यावर जमा केले असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी 2014 च्या सत्ताधारी पक्षाच्या कामावर निशाणा साधला.

त्यांच्या कार्यकाळात काळात विकास कामे अत्यल्प प्रमाणात झाल्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मला ते दिवसही आठवतात जेव्हा फार प्रयत्न करूनही उत्तरप्रदेशमध्ये घरे बांधली जात नव्हती. केंद्र सरकार गरिबांना घरे बांधण्यासाठी पैसे देत नव्हते, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

दरम्यान, आपण सर्वांना सांगू इच्छितो की, यापुर्वी माझे जे सहकारी होते ते झोपडपट्यांमध्ये राहत होते. त्यांच्याकडे पक्की घरेही नव्हती. त्या लोकांना आता घरे बांधुन दिली आहेत तसेच ही बांधलेली घरे छोटी असणार नसल्याचं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

किती गोड! अस्वलाच्या पिल्लाला बर्फ पकडताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

‘आर्यन एक गुणी मुलगा, दुर्देवानं…’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आर्यन खानला पाठिंबा!

“मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More