Top News पुणे महाराष्ट्र

कोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…”

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. याबाबतची माहिती सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दिली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या वापरासाठी येत्या दोन आठवड्यांमध्ये औषध महानियंत्रकांकडे अर्जाद्वारे मागणी करणार असल्याचं मोदी यांच्या भेटीनंतर आदर पुनावाला यांनी सांगितलं होतं. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची माहिती पुनावाला यांनी दिली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. तसेच हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत, असं आदर पुनावाला यांनी म्हटलंय.

सर्वांना दिलेल्या शब्दानुसार 2020 हे वर्ष संपण्यापूर्वी सिरमने भारतात तयार होत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या पहिल्यावहिल्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत, असं पुनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी संतापले; “जबरदस्ती भारत बंद केला तर…”

“आम्ही येणार म्हणणारे फडणवीस सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत”

कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य, म्हणाले…

…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जीं

“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या