बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साखरपुडा झाल्यानंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार, प्रेयसीने केलं असं काही की…

पुणे | पुण्यातील चंदननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीचा काही दिवसांपुर्वी तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा पार पडला होता. मात्र, त्यानंतर संबंधित प्रियकराने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर प्रेयसीने जे केलं ते अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

चंदननगर येथील बोराटे वस्तीमधील ही घटना आहे. संबंधित प्रेयसीचं नाव पुर्णा बंशपती चौधरी असं आहे. तसेच संबंधित प्रियकराचं नाव कपिल मदन गोरे असं आहे. मदन आणि पुर्णा गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपुर्वीच दोघांचा साखरपुडा देखील पार पडला होता.

साखरपुड्याच्या काही दिवसांनंतरच कपिल लग्नासाठी टाळाटाळ करु लागला. याच नैराश्यातून पुर्णाने आपल्या राहत्या घरी खोलीत ओढणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. यामध्ये पुर्णाचा मृत्यू झाला असून तिच्या वडिलांनी कपिलच्या विरुद्ध पुर्णाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असल्याची तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, कपिलच्या घरातील व्यक्ती पुर्णाबद्दल अनेक गोष्टी सांगून कपिलला लग्नाच्या विरुद्ध करत होते. यातूनच कपिलने लग्नास नकार दिला असल्याचं समोर आलं असून कपिलसोबत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच अधिक तपास आता स्थानिक पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

पद्मावतनंतर अक्षय कुमारचा ‘हा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेनं दिली खुली धमकी

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

“मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी”

“औरंगजेबाला स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, चंद्रकांतदादांना अजित पवार दिसतात”

पुण्यातील भोर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार अन् पुढे घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More