बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Ajaz Patelची ऐतिहासिक कामगिरी! अनिल कुंबळे आणि जीम लॅकर यांच्या विक्रमाशी बरोबरी

मुंबई | भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (IndVsNz) सध्या कसोटी मालिका (Test Match) चालू आहे. दोन कसोटी सामन्याच्या या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात पहिला दिवस भारताच्या मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) गाजवल्यानंतर आता दुसरा दिवस न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) गाजवला आहे. (Ajaz Patel took 10 wickets)

दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीनं (Captain Virat Kohali) फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण सलामीवीर मयंक अग्रवालच्या (Mayank Agrawal) शतकानं कमाल केली. मात्र, दुसरीकडे न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आपल्या फिरकीचा मारा सुरू ठेवत भारतीय फलंदाजांची दैना केली होती.

एजाज पटेलने 48 षटकात 119 देत 10 विकेट मिळवले आहेत. या 48 षटकात त्याने 12 षटक मेडन देखील टाकले. भारतीय गोलंदाजांना एजाजने मैदानात टिकू दिलं नाही आणि एकामागून एक फलंदाज तंबुत परतवले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. जीम लॅकरने 1956 मध्ये 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.

दरम्यान, भारताकडून अनिल कुंबळेने एकाच सामन्यात 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव आणि मोहम्मद सिराज या 10 खेळाडूंच्या विकेट काढल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना अमेरिकेकडून ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर

“आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवतोय, काँग्रेसला दूर ठेवून…”

गजराज भडकले अन् पर्यटकांची उडाली तारांबळ! पुढे काय झालं बघाच; पाहा व्हिडीओ

‘बाबा नको जाऊ दूर…’,वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवची भावूक पोस्ट

बच्चू कडू वादाच्या भोवऱ्यात! वंचितकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More