Top News पुणे महाराष्ट्र

‘निसर्ग’ आपत्तीत ठाकरे सरकार जनतेच्या पाठीशी- अजित पवार

पुणे | ‘आई जशी संकटाच्‍या येळेला कंबर बांधून लेकरांच्‍या पाठिशी वुभी राहती, तसंच तुमी प्रजेसाठी वुभे रहावा’ अशा शब्‍दांत मावळ तालुक्‍यातील पवळेवाडी येथील 70 वर्षीय सावित्रीबाई गुणाजी जागेश्‍वर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. ‘निसर्ग’ चक्रीवादळात त्‍यांच्‍या फुलशेतीचे अतोनात नुकसान झाले असले तरी या संकटाच्‍या काळी शासन आपल्‍या पाठीशी उभे आहे, हा विश्‍वास उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पीडित शेतकऱ्यांना दिला.

आपद्ग्रस्‍तांना दिलासा मिळावा तसेच शासन आपल्‍या पाठीशी उभे आहे, ही भावना निर्माण व्‍हावी यासाठी अजित पवार यांनी जिल्‍ह्याचा दौरा केला, त्‍यावेळी श्रीमती सावित्रीबाईंनी उपमुख्‍यमंत्री पवारांना एक प्रकारे साकडेच घातले. त्यावर अजित पवारांनी काही काळजी करण्याचं कारण नाही. शासन आपल्या पाठीशी उभे आहे. लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल, असा दिलासा दिला.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्‍ह्यातील जुन्‍नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, शिरुर आणि इंदापूर या तालुक्‍यातील 371 गावात मोठे नुकसान झाले आहे. नजरअंदाज अहवालानुसार बाधित शेतकऱ्यांची संख्‍या 28 हजार 496 इतकी असून एकूण बाधित क्षेत्र 7 हजार 874 हेक्‍टर इतके आहे.

3 मे 2015 च्‍या शासन निर्णयानुसार मयत व्‍यक्‍तींसाठी 4 लाख रुपये, 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त अपंगत्‍व आलेल्‍या व्‍यक्‍तीसाठी 2 लाख रुपये, 40 ते 60 टक्‍के अपंगत्‍व आलेल्‍या व्‍यक्‍तीसाठी 59 हजार 100, जखमी व्‍यक्तीच्‍या इस्पितळ  कालावधीनुसार 4300 ते 12 हजार 700 रुपये इतकी नुकसान भरपाई दिली जाते. मोठ्या मयत दुधाळ जनावरांसाठी 30 हजार रुपये, छोट्या मयत दुधाळ जनावरांसाठी 3 हजार रुपये, ओढकामाच्‍या लहान मयत जनावरांसाठी 16 हजार रुपये, ओढकामाच्‍या मोठ्या मयत जनावरासाठी 25 हजार रुपये, प्रती मयत कोंबडीसाठी 50 रुपये (जास्‍तीत जास्‍त प्रती कुटुंब 5 हजार रुपये) नुकसान भरपाई दिली जाते, अशा प्रकारे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

पुण्यालगत असणाऱ्या ‘या’ 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द

राज्यात आज तब्बल 2234 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा तुमच्या भागात किती नव्या रूग्णांची नोंद…

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या