उद्धव ठाकरेंचे नाचता येईना, अंगण वाकडे!- अजित पवार

उद्धव ठाकरेंचे नाचता येईना, अंगण वाकडे!- अजित पवार

ठाणे | मुंबईत पाऊसच एवढा पडतो, त्याला आपण काय करणार, असं वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा अजित पवारांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य म्हणजे नाचता येईना, अंगण वाकडं, असा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

ठाण्यात आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

मुंबईत पाऊस पडतो, तसा तो नवी मुंबईतही पडतो. मात्र पहिल्याच पावसाच मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पाणी तुंबते. नवी मुंबईच्या बाबत हे का घडत नाही?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

Google+ Linkedin