Top News पुणे महाराष्ट्र

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ जंगी मिरवणुकीवर अजित पवार म्हणाले….

पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यांमधून निर्दोष मुक्तता झाली होती. गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी आणि त्याच्या टोळीतील मुलांनी जंगी मिरवणुक काढली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता मात्र मारणे जामीनावर सुटला. मारणेच्या मिरवणुकीची चर्चा राज्यभर रंगली होती. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निर्दोष सुटल्यानंतर तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत निघालेल्या गुंडाची मिरवणुक सामाजिक आरोग्यासाठी घातक आहे. त्यातून तरूण पिढीसमोर चुकीचा आदर्श ठेवला जातो. त्यामुळे वरिष्ठ पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी अशा गोष्टींवर लक्ष ठेवावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे पोलीस दलाच्या आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल पुन:प्रदान आणि अनकंपावरील पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रदान करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 साली गजानन मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. काही काळ येरवडा कारागृहात ठेवल्यानंतर त्याची कोल्हापूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. सध्या तो तळोजा कारागृहात होता. बाहेर आल्यावर त्याच्या स्वागत मिरवणुक काढत करण्यात आलं.

दरम्यान, दरम्यान, गेल्या महिन्यात शरद मोहोळ तुरुंगातून बाहेर आला असून इतरही काही गुंड सध्या बाहेर आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा टोळीमध्ये वर्चस्व वादावरून टोळीयुद्ध रंगतं की काय अशा चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कॉलेजला गेलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला कालव्यात, घरातलाच आरोपी निघाल्याने खळबळ!

‘…पण इतिहास चुकीचा होता’; शिवजयंतीनिमित्त वीरूचं खास ट्विट

तबलिगी प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?; तृप्ती देसाईंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सावधान! राज्यातील या दोन जिल्ह्यात सापडले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण

संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या