मुंबई | अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने धक्कादायक गोप्यस्फोट केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत 14 वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा केलाय.
मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. पण त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता, असं इराने सांगितलंय.
मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. परिणामी एक वेळी आली जेव्हा मी ड्रिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली, असं इऱाने म्हटलंय.
सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी 14 वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणं टाळायची. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे, असं इराने सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा
मी निवृत्त होतेय पण…- पी. व्ही. सिंधू
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांशी आमचा संबंध नाही- गिरीश महाजन
‘माणुसकीचा फ्रीज’, कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी मनसेचा उपक्रम
“इतना सन्नाटा क्यूँ है भाई?, सुशांतप्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्प का?”