औरंगाबाद | मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. त्यापूर्वी राज ठाकरे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे लागलं आहे.
राज ठाकरे आज पुण्यात दाखल झाले असून ते लवकरच औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) औरंगाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी या सभेआधी मोठं वक्तव्य केलं आहे.
औरंगाबाद पोलिसांनी अनेक अटी-शर्तींसह या सभेला परवानगी दिली आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या 75 डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावर आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करून घ्यायला तयार आहोत, असं वक्तव्य अमित ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान, तयारी उत्तम झाली असून सर्वांमध्ये सभेची प्रचंड उत्सुकता आहे. उद्याची सभा जोरदार होईल यात शंका नाही, असं देखील अमित ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असल्याने राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलणार हे बघावं लागेल.
थोडक्यात बातम्या-
मुंबई पोलिसांचा राणा दांपत्याबद्दल धक्कादायक दावा, ‘ही’ माहिती समोर
नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर राखी सावंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
…’हे’ षडयंत्र भाजपवरच उलटणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवार पोहोचले गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ
चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्यानं अजित पवारांनी भरला ‘इतक्या’ हजारांचा दंड
Comments are closed.