बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढल्या, कधीही होऊ शकते अटक

मुंबई | शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सिटी सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. त्यातच मुंबई सत्र न्यायालयाने अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकाळात 900 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास ईडीकडे देण्यात आला होता. दरम्यान, ईडीने अडसूळ यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. या दरम्यानच अडसूळ यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अडसूळ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई सत्र न्यायालयाने आनंदराव अडसूळ यांची अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने या अर्जाची सुनावणी 25 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान, अडसूळांनी पुढील सुनावणीपर्यंत तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मात्र, ती ही मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे अडसूळांना कधीही अटक होऊ शकते.

 

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More