बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मोदींच्या मंत्रीमंडळातून ‘या’ मंत्र्याला वगळलं

नवी दिल्ली | नरेंंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात अनेक नवे चेहरे दिसले तर दूसरीकडे अनेक जुन्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. यापैकी एक नाव म्हणजे अनंतकुमार हेगडे यांचं आहे.

अनंतकुमार हेगडे यांनी वारंवार केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

भाजप संविधान बदलण्यासाठी सत्तेत आला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तसेचं त्यांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी गोडसेबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं.

अनंत हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड मतदारसंघातून निवडूण आले आहेत. याआधी हेगडे मोदींच्या मागील मंत्रीमंडळात कौशल्य विकास मंत्रालयात राज्यमंत्री होते.

महत्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंची भूमिका काय? स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु

-महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे सोपावण्यात आली ‘या’ खात्यांची जबाबदारी

-अमित शहा गृहमंत्री होतील… ‘या’ नेत्याचं भाकित खरं ठरलं!

-बेन स्टोक्सने रचला इतिहास, तब्बल 23 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची केली बरोबरी

-धक्कादायक! बिहारमध्ये भाजप नेत्याची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More