महाराष्ट्र मुंबई

“रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा”

मुंबई | पैसे वाटून बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना अटक करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमीका घेत अर्णब गोस्वामींच्या अटकेची मागणी केलीये.

सत्यमेव जयते! ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स टीव्ही’च्या चालकांप्रमाणेच लोकांना पैसे देऊन बनावट टीआरपी वाढवण्याऱ्या ‘रिपब्लिक’ चॅनेलच्या अर्णब गोस्वामी यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्याकडे करतो, असं ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचंय”

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

‘रिपब्लिक’कडून TRPचा खेळ?; दोन मराठी चॅनेल मालकांनाही अटक

‘इतक्या चांगल्या दर्जाची नशा आणता कुठून?’; भाजप नेत्याचा राहुल गांधींना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या