बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेवणात मटण नाही म्हणून नवरदेव पसार अन्…

नवी दिल्ली | अनेक वेळा भर मंडपात लग्न तुटल्याच्या घटना समोर येतात. यामागे अनेक कारणं देखील असतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांना कोड्यात पाडलं आहे. लग्नात जेवणात मटण नसल्याने स्वतः नवरदेव लग्नातून पसार झाल्याची बातमी समोर आली आहे.

संबंधित घटना ही ओडीसा येथील असून नवरदेवाचं नाव रमाकांत पात्र असल्याचं सांगितलं आहे. त्याचं लग्न सुकिंग येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरलं होतं. लग्नासाठी जेवणाचीही चांगली तयारी करण्यात आली होती. मात्र लग्नात जेवायला मटण नसून नवरदेवाला हिच बाब नवरदेवाच्या जिव्हारी लागली आणि लग्नात मटण नसल्याचं दिसताच त्यानं लग्न करण्यास नकार दिला.

ही घटना बुधवारी घडली आहे. लग्नासाठी नवरदेवाचं वाजत-गाजत स्वागत करण्यात आलं होतं. लग्नाचे विधी चालू होते इतक्यातच जेवणात नेमकं मटण नसल्यामुळे वऱ्हाड्यांचा हिरमोड झाला. त्यांनी मुलीकडील नातेवाईकांसमोर आरडा-ओरडा सुरू केला. ही बाब नवरदेवाच्या कानावर पडली. मुलाकडील सदस्यांचं म्हणणं होतं की, लग्नात मटणाची मागणी आधीपासून करण्यात आली होती. ती पूर्ण का केली नाही? मटण का ठेवलं नाही??

दरम्यान, लग्नातून नवरदेव गुपचूप पसार झाला आणि हे लग्न तिथंच मोडलं. मात्र नवरदेवाने त्याच रात्री नातेवाईकांच्या गावातील एका मुलीशी लग्न केलं. त्यामुळे लग्न तुटलं तरी शेवटी तो नवरी घेऊनच घरी परतला.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रपतींचा दौरा दोघांच्या जिवावर बेतला! 3 वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेने प्राण गमावले

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मोदी सरकार विरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार? राऊतांनी दिली आतली बातमी

कोरोनाकाळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेत बँकिंग सेक्टरला मात्र अच्छे दिन; नफ्यात दुपटीने वाढ

‘उद्धव ठाकरेंनी सरनाईकांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे’; संजय राऊतांचं सूचक विधान

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More