बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, मी साधी सिगारेट देखील ओढत नाही”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसत आहे. अशातच आता नवाब मलिक यांनी आज आणखी एक पत्रकार परिषद घेतली आहे. यात नवाब मलिकांनी काशिफ खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता काशिफ खान यांनी नवाब मलिक यांच्या प्रत्युत्तर दिलं आहे.

नवाब मलिक यांच्याकडे अपुरी माहिती आहे.मला वाटतंय की, मलिक यांच्याकडे सर्व चुकीची माहिती आहे. माझा कोणत्याही ड्रग्जच्या व्यवहाराशी संबंध नाही. मी साधी सिगारेटही ओढत नाही हे लोकांना देखील माहिती आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप पुर्णपणे निराधार असून ते चुकीचे आहेत, असंही काशिफ खान म्हणाले आहेत.

माझा कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही. त्यारात्री क्रुझवर सरकारी सुरक्षा यंत्रणा होती. शस्त्र कुठून आली हे त्यांनाच विचारायला हवं, असंही काशिफ खान म्हणाले आहेत. मी समीर वानखेडेंना ओळखत देखील नाही. तो कार्यक्रम मी आयोजित केला नव्हता. माझ्याकडे सर्व गोष्टींची बिलं आहेत, हे मी सिद्ध देखील करू शकतो, असंही काशिफ खान म्हणाले आहेत. एबीपीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, समीर वानखेडेंचा दाढीवाला ड्रग्ज माफिया मित्र क्रुझवर त्या रात्री असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. त्या व्यक्तीचं नाव काशिफ खान आहे. ते फॅशन टीव्हीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर ते फॅशनच्या नावाखाली पॉर्नचा धंदा करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी यावेळी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

“आमच्याकडे अहो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात, मी पहिल्यांदाच ऐकलं की लाडाने दाऊदही म्हणतात”

ड्रग्ज प्रकरणात नाव आल्याने अनन्याच्या हातून बिग बजेट सिनेमे जाणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More