मुंबई | भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका शिवसेनेने केली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेने नागपूरमध्ये जाऊन हिंदुत्वाचा क्लास लावावा. अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.
शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली?, असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.
भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली. त्यानंतर शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर शिवसेना ही अमिबालाही लाज वाटेल अशा पद्धतीने दिशाहीन झाल्याचंच हे लक्षण आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“…तुम्ही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवा, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नका”
“बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”
क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का; कंगणाचा रोहितला रिप्लाय
“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”