नवी दिल्ली । कमी युजर्समुळे फेसबुकला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मेटाने जाहीर केल्याप्रमाणे युजर्सची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यावर परीणाम झाला आहे. याचा थेट परीणाम कंपनीकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर होणार आहे. काही तासामध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 22 टक्क्यांनी घसरले आहे. त्यामुळे आता फेसबुक मोठा धक्का बसला आहे.
या निराशाजनक कारणांसाठी नेटफ्लिक्ससारखा ओटीटी प्लॅटफॉर्म जबाबदार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. मेटाला गेल्या वर्षीच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये 10.3 बिलियन डॉलर नफा झाला असूनही दररोजच्या वापरकर्त्यांच्या संख्येत अपेक्षेप्रमाणे झालेली दिसून येत नाही. कंपनीने आपले नाव बदलल्या नंतरचा हा पहिलाच परिणाम आहे.
2021च्या शेवटच्या दोन-तीन महिन्यातच फेसबुक अॅपने जवळपास 10 लाख रोजचे वापरकर्ते गमावले. अॅपचे अजून 2 अब्ज रोजचे युजर्स आहेत. कंपनीचे मुख्य अधिकारी डेव्हिड वेनर म्हणाले होते की, प्रतिकूल परिस्थितीमुळे जगभरातील वापरकर्ते कमी झाले आहेत. आशिया-पॅसिफिक देशातील कोरोना महामारी आणि भारतामध्ये झालेल्या मोबाईल डेटामधील किंमतीच्या वाढीमुळे फेसबुक वापरकर्ते कमी झाले आहेत.
कंपनीला अनेक प्रकारच्या तपासला आणि गैरवापराच्या तक्रारीला सामोरं जावं लागत आहे. फेसबुकला निराशाजनक कामगिरीसाठी स्पर्धा आणि पुरवठा साखळीतील अडचणींवर अक्षेप केला आणि त्याचा परिणाम ग्राहक व जाहीरातदारांवर झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
‘लै खुलासे करायचेत, लै गुपितं उलगडायची हायेत’; किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत
Skin care Tips: कोरडी त्वचा असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा
भिडे पूल होणार इतिहासजमा, पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
महेश मांजरेकर यांनी लेकीच्या अभिनयाविषयी सांगितली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
बाॅलिवूडला मोठा धक्का! सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं निधन
Comments are closed.