बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! काॅंग्रेस नेते सचिन पायलट पोलिसांच्या ताब्यात; उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई

लखनऊ | उत्तर प्रदेश मधील घडणाऱ्या घडामोडींवरून देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. लखीमपूर खेरी येथील अमानवी घटनेनंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. लखीमपूर खेरी येथे शेतकरी परिवाराला भेटण्यासाठी जात असलेल्या काॅंग्रेस नेत्यांना अडवण्यात आलं आहे. त्यातच आता राजस्थान काॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

काॅंग्रेसचे युवा नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरी येथे जाण्यापासून रोखलं आहे. उत्तर प्रदेश सरकारनं आधी सचिन पायलट यांना परवानगी दिली होती. पण अचानक पायलट यांना मुरादाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परिणामी काॅंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुरादाबाद येथे उपस्थित आहेत. त्यामुळे पोलीस परिस्थिती चिघळू नये म्हणून कार्यवाही करत आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय काॅंग्रेस प्रतिनिधी मंडळात सचिन पायलट यांचा समावेश आहे. याआधी राहुल गांधी यांना सुद्धा पोलिसांनी लखनऊ विमानतळावर अडवलं होतं. आता सचिन पायलट यांना पोलिसांनी अडवल्यानं योगी सरकार आणि काॅंग्रेसमधील वाद आणखीन वाढण्याची चिन्हं आहेत. सचिन पायलट यांच्यासोबत आचार्य प्रमोद कृष्णन यांनाही ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, सचिन पायलट यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचं काॅंग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सचिन पायलट यांना अटक करण्यात आल्यानं काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.

 थोडक्यात बातम्या 

आयपीएलमध्ये खेळायची संधी सांगून अनेकांना फसवणूक; अनेक मोठी नावं बाहेर येण्याची शक्यता

”आज देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल लागला”

‘कॅप्टन कूल धोनी’ घेणार आयपीएलमधून निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार अखेरचा सामना

“चुलीत गेलं ते राजकारण…उद्याच राजीनामा फेकतो, मला त्याची गरज नाही”

‘आम्ही त्याला पकडलं नाही फक्त त्याच्यासोबत…’; मलिकांच्या आरोपांवर भानुशालींचं प्रत्युत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More