भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा प्रगतीपथावर आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 2014 च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी विजय मिळवलेल्या जागा त्यांच्याकडेच राहणार आहेत.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युतीबाबत फोन वरून चर्चा झाली आहे. भाजप-शिवसेना यांच्यातील युतीचा निर्णय मुंबईत जाहीर करण्यात येणार आहे, अशी देखील माहिती समोर येत आहे.

युतीची बहुतांश जागांवर चर्चा पूर्ण झाली असून, 8 जागांवर अद्याप चर्चा पुढं गेलेली नाही. 

दरम्यान, 2014 च्या निवडणूकीत भाजपनं 23 जागांवर तर शिवसेनेनं 18 जागंवर विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”

-“शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”

-2019 ची लोकसभा निवडणूक म्हणजे पानिपतची लढाई- अमित शहा

-15 लाख रुपये खात्यावर आलेला 1 खातेदार दाखवा- धनंजय मुंडे

-उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते ‘या’ कारणासाठी आले एकत्र!