बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेना-भाजपमध्ये बॅनरवॉर, सुपर संभाजीनगर बोर्डासमोर भाजपचा ‘नमस्ते संभाजीनगर’

औरंगाबाद | औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा अजुनही शांत झालेला दिसत नाही. यावरून आधीच राज्य सरकारमधील पक्षांमध्ये मतभेद असलेले पाहायला मिळाले. अशातच राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे हे औरंगबादच्या दौऱ्यावर आहेत याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये बॅनरवॉर सुरु झाल्याचं बोललं जात आहे.

आदित्य ठाकरे यांचा दौरा लक्षात घेऊन येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी शहरात जागोजागी सुपर संभाजीनगरचे बॅनर लावले आहेत.

शिवसेनेच्या याच कॅम्पेनिंग विरोधात भाजपने एकीकडे नमस्ते संभाजीनगर म्हणत बॅनरबाजी केली आहे. भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपने नमस्ते संभाजीनगर लिहून मोठे बॅनर लावले आहे.

दरम्यान, काही ठिकाणचे आदित्य ठाकरेंचेही बॅनर संभाजीप्रेमींनी काढले आहेत. महाराजांच्या पुतळ्याला अडथळा होत असल्यामुळे आदित्य यांचे बॅनर हटवल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार राज्यव्यापी कोरोना लसीकरणाचा लसीचा शुभारंभ

“संभाजीनगर म्हणा, नाहीतर धाराशिव म्हणा; याकडे मी गांभीर्यानं बघत नाही

“…म्हणून हेगडे देखील आता माझ्यावर आरोप करत असावेत

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, फौजदारी गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More