देश

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 30 जणांसह बोट नदीत बुडाली

नवी दिल्ली | प्रवाशांनी घेऊन जाणारी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील बूंदी जिल्ह्याच्या सीमालगत भागात असलेल्या गोठडा कला गावाजवळ ही मोठी दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बुडालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेची माहिती पोलीस आणि प्रशासनाला देण्यात आली. पोलीस आणि NDRF टीम घटनास्थळी दाखल झाली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काहींचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती आहे.

बोटीत असलेल्या प्रवाशांची तसेच बुडालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या