मुंबई | ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये. एखाद्याला आयुष्यातून उठवायचे ही पत्रकारिता कधीच पटणार नाही, असं परखड मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकारितेवर मांडलं आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतं असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारितेवर भाष्य केलं. त्यावेळी ते बोलतं होते. ते म्हणाले की, “काळाच्या ओघात आपण वाहून तर जात नाही ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जसा फरक आहे फरक आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यात आहे. बातमीदारी आक्रमक असली तर नक्कीच आवडेल. मात्र बातमीदारीत आक्रस्ताळेपणा नको.”
सध्या जी वाहिन्यांवरील स्पर्धा सुरु आहे. त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, जे जनतेला समजायला हवे ते देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. टीआरपीच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवलं जातं ते बंद व्हायला पाहिजे. तसे होता कामा नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जनतेचे आरोग्य नीट राहावे म्हणून जसे आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच सामाजिक आरोग्य नीट राहावे यासाठी वृत्तवाहिन्यांनीही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
थोडक्यात बातम्या-
…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय
येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ
‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर
आजपासून मुंबईतील ‘या’ मार्गावर धावणार एसी लोकल!
“कोविडने अमेरिकेसारख्या देशाची निवडणूक थांबली नाही अन् आपण संसदेचे हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही”