निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

निकालाआधीच श्रीपाद छिंदमला दणका; भाऊ श्रीकांत छिंदमला अटक

अहमदनगर | शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या भावाला निकालाआधीच दणका बसला आहे. पोलिसांनी श्रीकांत छिंदमला अटक केली आहे.

श्रीकांत छिंदमने काल मतदानापूर्वी मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएमची पूजा केली होती. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी त्याचावर गुन्हा दाखल केला होता. 

श्रीपाद छिंदम आणि त्याची पत्नी अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते दोघेही विजयी व्हावे यासाठी श्रीकांतने ईव्हीएमची पूजा केली होती.

दरम्यान, श्रीकांतला पूजा करण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राम मंदिरासाठी भीक मागत नाही, अध्यादेश काढा; संघाने भाजपला सुनावले

-भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यानं मोफत वाटला कांदा

-“मराठीची सक्ती म्हणजे मातृभाषेचा अपमान”

-…असे हल्ले गल्लीबोळातील नेत्यांवर होत असतात- प्रकाश आंबेडकर

-आता श्रीपाद छिंदमच्या भावावर देखील गुन्हा दाखल

Google+ Linkedin