Top News उस्मानाबाद

शेतकऱ्यांना मदत पुरवण्यास केंद्रानेही सहकार्य करावं- शरद पवार

उस्मानाबाद | अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर आणि लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

शरद पवार म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं असून अनेक ठिकाणी जमीन खरवडून गेल्याचं दिसून आलंय. शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान एका दिवसात भरून येण्यासारखं नाहीये. यांच्या मदतीसाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत त्यामुळे यामध्ये केंद्राने देखील मदत केली पाहिजे.

दरम्यान, या संकटातून उभे राहू. धीर धरा, आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू असा शब्द पवारांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

“मी आणि माझं कुटुंब म्हणत मुख्यमंत्री मात्र घरातच बसलेत”

7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या