औरंगाबाद महाराष्ट्र

खैरेंना धूळ चारलेल्या जलीलांनी उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

औरंगाबाद | आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेबरोबर माझा सामना होईल, त्यावेळी मी एमआयएमचे 7 आमदार मराठवाड्यात निवडून आणेल, असं आव्हान औरंगाबादचे नवनिर्वाचीत खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आता पराभवाची सवय करुन घ्यावी, असा टोलाही जलील यांनी लगावला आहे. ते हैदराबादमध्ये बोलत होते.

औरंगाबाद लोकसभेतला पराभव फक्त चंद्रकांत खैरेंचा झालेला नाही. तर तो माझा पराभव झालाय अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यावर  बोलताना जलील यांनी उद्धव ठाकरेेंवर टीका केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर ते पहिल्यांदाच हैदराबादमध्ये एमआयएम पक्षाने आयोजित केलेल्या सत्कार सभेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

-जागावाटपावरून सेना-भाजपात धुसफूस; त्यात आता आठवले म्हणतात मला ‘एवढ्या’ जागा दया

-पक्षाच्या वर्धापनदिनी रोहित पवार म्हणतात, भाकरीच नाही तर पीठसुद्धा बदलायची गरज…

-ना मी मोदींकडे गेलो ना शहांकडे… तरी मला मंत्रीपद मिळालं- रामदास आठवले

-वायनाडच्या 40 टक्के मुसलमानांनी राहुल गांधींना विजयी केलंय- असदुद्धीन ओवैसी

-विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या