मुंबई | अधिवेशनात अर्थसंकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंट वरून फुटलाय, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला. यावर टेक्नालॉजी खूप पुढे गेली आहे. पण धनंजय मुंडे यांनी आपल्या अज्ञानातून प्रश्न उपस्थित केला, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सभापती खरं तर सगळया सभागृहाचे असायला पाहिजेत. मात्र त्यांनी नियम न पाळता धनंजय मुंडेंना बोलायला संधी देऊन नियम मोडला. आम्ही सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहोत, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, जबाबदारीच्या पदावर असताना अर्थमंत्र्यांकडून चूक घडणे दुर्दैवी बाब आहे. सभागृहाचा हा अपमान आहे. सरकारने सभागृहाची माफी मागावी, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
-राष्ट्रवादी-अभाविपचे कार्यकर्ते भिडले; पुणे विद्यापिठाच्या नाशिक कार्यालयात धुमाकूळ
-वंदे मातरम इस्लामविरोधी आहे, आम्ही म्हणणार नाही- सपा खासदार
-निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचं तरूणांना मोठं आश्वासन
-स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारची मोठी घोषणा
-अभिनेता संजय दत्तचा पहिला मराठी सिनेमा, पाहा टिझर
Comments are closed.