बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

मुंबई | 2024 लोकसभा निवडणुकीला (2024 Lok sabha Elections) आणखी बराच अवधी शिल्लक आहे. तरी देखील निवडणुकीची सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी पक्ष (Opposition Partis) जोमानं तयारी करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banarajee) सध्या मोदी विरोधकांचा मोर्चा तयार करण्यासाठी देशभर राजकीय दौरे करत आहेत. अशात त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे.

ममता बॅनर्जी आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळायचा, त्यांची पाठ वळली की काँग्रेसच्या सुरात सूर मिसळायचा, अशी शिवसेना (Shivsena) म्हणजे डबल ढोलकी आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यादरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे त्यांच्या भेटीला गेले होते त्यावरून भाजपनं शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बाबरी मस्जिद विद्ध्वसांबाबत ट्विट केल्यावरून भाजपनं त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. नार्वेकर यांचं ट्विट म्हणजे महाविकास आघाडीच्या पायालाच सुरूंग लागला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करून महाविकास आघाडीत आहेत म्हणून काॅंग्रेसची स्तूती करत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, कधीकाळी काॅंग्रेसप्रणित युपीएच्या विरोधात असणारी शिवसेना सध्या युपीएच्या एकसंधतेसाठी प्रयत्न करत आहे. देशाच्या बदलत्या राजकारणाचा नवा पायंडा शिवसेनेनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून घातला आहे हे मात्र नक्की.

थोडक्यात बातम्या 

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

चिंता वाढली! पुणे आणि डोंबिवली पाठोपाठ ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करतो, पण ते माझा फोन घेत नाहीत”

OBC Reservationचा वाद पेटला! भुजबळ म्हणतात,”फडणवीस त्यांना थांबवत का नाहीत?”

“नाना पटोलेजी राजकारण ठेवा बाजूला, तुम्ही स्वत:ला OBC नेता समजता ना?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More