Top News

पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

पुणे | परळीची असलेल्या पुजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पुजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची राज्य सरकारने स्वत:हून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजाच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यपाल काही फक्त भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचेही आहेत- संजय राऊत

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंवर ‘ED’ची धडक कारवाई, मुलाला मुंबईला नेलं!

परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“…म्हणून त्यांनी अमित शहांना बोलवून शिवसेनेला संपवण्याची सुपारी दिली”

हिंदी चिनी पुन्हा भाई-भाई!; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या