बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांची भावना समजून घेऊ शकतो”

मुंबई। विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला. शिवसेनसेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे 35 आमदार फुटले.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. महाराष्ट्र राजकीय भूकंप येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात घडणाऱ्या छोटछोट्या गोष्टींवर आम्ही बारकाईने नजर ठेवत आहोत. त्यामुळे काही बदल होतील असं म्हणणं आता थोडं घाईगडबडीचं आहे. अजून तरी आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून काही निरोप आला नाही. जर आमच्यासमोर त्यांनी प्रस्ताव मांडला तर आम्ही त्यावर जरूर विचार करू, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. हे दोन अडीच वर्ष सोडले तर शिवसेना आमच्याच सोबत होती त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांची भावना समजून घेऊ शकतो, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, जर अम्हाला सरकार स्थापना करण्यास मदत होत असेल तर आम्ही शांत बसू शकणार नाही. आम्ही काय भजनी मंडळ नाही. आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी नक्कीच धडपड करू आणि त्यासाठी आमची सावध भूमिका आहे. मात्र, जनता संजय राऊत यांना सहन करू शकणार नाही, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

एकनाथ शिंदेंच्या नाराजीनाट्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ऑफर

“…त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार नाही”

“एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More