बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद; महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कालच मुख्यमंत्र्यांनी 30 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन हा 15 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज संध्याकाळी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असून या संवादात राज्यातील लसीकरण, कोरोना रूग्णसंख्या तसेच लॉकडाऊन या विषयावर मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री आज एखादी मोठी घोषणा करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 15 मे नंतरच 18 वर्षांवरील लोकांचं लसीकरण केलं जाईल, असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री या विषयावर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याने ते कोणती मोठी घोषणा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचं प्रमाणही अधिक आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज जनतेला संबोधित करताना कोण-कोणत्या विषयावर बोलणार आणि काही महत्त्वाचा निर्णय घोषित करणार का याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात बातम्या

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More