बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरभजन सिंग पुन्हा बाबा झाला, पत्नी गीता बस्रानं मुलाला दिला जन्म

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बस्राच्या घरी पाहुण्याचं आगमन झालं आहे. हरभजन सिंहनं ट्विट करुन मुलगा झाल्याचं सांगितलं आहे. मुलगा झाल्याची बातमी कळताच हरभजन आणि गीता बसरावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. हरभजन सिंगनं 2015 साली अभिनेत्री गीता बस्रासह लग्न केलं होतं आणि 2016 मध्ये त्यांच्या घरी नन्ही परीचं आगमन झालं होतं. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव हिनाया असं आहे.

गीता बसराने मार्च महिन्यातच आपल्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती. तिने त्यावेळी जे फोटो शेअर केले आहेत त्यात हरभजन आणि त्यांची मुलगी दिसले होते. हरभजन आणि गीता बस्रा यांची एक पाच वर्षाची मुलगी आहे. हरभजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. हरभजनने पोस्टमध्ये मुलगा आणि बायको दोघेही सुखरुप असल्याची माहिती दिली असून कॅप्शनमध्ये देवाचे धन्यवादही मानले आहेत.

हरभजनने लिहिलं आहे, “आम्ही देवाला धन्यवाद करतो की आम्हाला एक स्वस्थ मुलाच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत. गीता आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. आम्ही दोघेही अत्यंत आनंदी असून सर्व शुभचिंतकाचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्द आभार मानतो.”

दरम्यान, गीता बस्रा ब्रिटेनमध्ये जन्मली. तिनं 2006 मध्ये इमरान हाशमीसोबत ‘दिल दिया है’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘द ट्रेन’ मध्येही ती दिसली. मात्र तिला बॉलिवूडमध्ये जास्त यश मिळू शकलं नाही. हरभजन आणि गीता आपल्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं.

पाहा पोस्ट:

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या ‘कप्पा व्हेरियंट’चा धोका वाढला; उत्तर प्रदेशात कप्पामुळे पहिला मृत्यू

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; ईडी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार

“आता तिथे सुखाने रहा, पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका”

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More