बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मात्र ‘या’ कारणामुळे घरीच राहणार?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार करत घेत होते. त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना 21 दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. अखेर आज उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज (CM Uddhav Thackeray get’s Discharge From Hospital) देण्यात आला आहे. मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांना घरूनच काम करावं लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काही चाचण्या करून आज त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांच्यासह त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री मुंबईतील एच. एन रुग्णालयात (H.N.Reliance Hospital)  उपचार घेत होते. त्यांना मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे आज तब्बल 3 आठवड्यानंतर वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. मात्र असे असले तरी उद्धव ठाकरेंना पुढील काही दिवस घरूनच काम करावं लागणार आहे. कारण त्यांची शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांनी त्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याना अजून काही दिवस वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे.

दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही जवळपास 3 आठवडे मुख्यमंत्र्याना रुग्णालयात राहून आराम करावा लागला होता. एच. एन. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी मुख्यमंत्र्याची शस्त्रक्रीया केली होती. सकाळी चाचण्या केल्यानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे

 

थोडक्यात बातम्या-

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांचा मोठा निर्णय, आता खासगी फोटो आणि व्हिडीओ…

‘2024 मध्ये 300 खासदार निवडून येतील असं वाटत नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा घरचा आहेर

बायकोचा वाढदिवस विसरणं पडू शकतं महागात; ‘या’ देशाने केलेला कायदा वाचून थक्क व्हाल

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More