बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

पुणे | कोरोनामुळे मागील अनेक दिवस बंद असलेली महाविद्यालये, विद्यापीठं पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आज राज्यातील महाविद्यालयांचे कॅम्पस पुन्हा गजबजणार आहेत.  सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी देखील केली आहे. मात्र अजूनही पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू होणार का? याबाबत शंका आहे.

कोरोनासंदर्भात नियमांचं पालन करण्यासाठी महाविद्यालयांनी त्यानुसार स्वच्छता सुरू केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता यावं यासाठी महाविद्यालयांनी त्यानुसार आसनव्यवस्था केली आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व जागा सॅनिटाईज करून घेतल्या आहेत. मुंबईतील सिडनहॅम, सेंट झेवियर्स या महाविद्यालयांनी तर विद्यार्थ्यांना प्रवेशद्वाराजवळ गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत देखील केलं आहे.

राज्यातील सर्व महाविद्यालये जरी आज सुरू झाली असली तरी पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये आज सुरू होतील, याबाबत अजूनही शंका आहे. कारण सरकारच्या निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना तशा सुचना दिल्या होत्या. मात्र त्या सुचना ऐनवेळी देण्यात आल्याने अनेक महाविद्यालयांना आजपासून कामकाज सुरू करता येणार नाही.

याशिवाय, पुणे विद्यापीठाचं यावर्षीचं पहिलं शैक्षणिक सत्र आज म्हणजे 20 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे लगेचच महाविद्यालये सुरू करण्याबाबत अजूनही शंका आहे. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयं लगेच सुरू करण्यात येतील याची शक्यता कमीच आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारमुळेच कोरोना आटोक्यात, सामनाच्या अग्रलेखातुन संजय राऊतांचा हल्लाबोल

सकाळी-सकाळीच किरीट सोमय्यांच्या ट्विटने उडवली खळबळ, आज दुपारी करणार…

मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More