देश

‘…हे पत्र एकदा नक्की वाचाच’; प्रियंका गांधींची नरेंद्र मोदींना विनंती

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनं ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली. त्यानं त्यापूर्वी एक भावूक करणारं आणि आपल्या व्यथा मांडणारं पत्र लिहिलं होतं. तसंच त्यानं आपण आत्महत्या का करत आहोत हेदेखील सांगितलं होतं. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हे पत्र शेअर करत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरूर वाचावं अशी विनंती केली आहे.

उत्तर प्रदेशातील भानू गुप्ता यांनी ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली ही अतिशय दु:खद घटना आहे. त्यांच काम बंद बंद झालं होतं. तसंच त्यांना आपल्या आईचे उपचारदेखील करायचे होते. सरकारकडून केवळ रेशन मिळालं होतं. पण आणखीही काही गोष्टी आवश्यक असतात त्या खरेदी कराव्या लागतात आणि काही गरजाही असतात असं भानू गुप्ता यांनी पत्रात म्हटल्याचं प्रियंका गांधी यांनी सांगितलं आहे. त्यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे.

हे पत्र कदाचित वर्षपूर्तीच्या पत्राप्रमाणे गाजावाजा करत तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण हे पत्र तुम्ही वाचाच. भारतात आजही अनेक जण अशाच परिस्थितीचा सामना करत आहेत, असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं आहे.

मी गरीबी आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करत आहे. सरकारच्या मदतीतून गहू आणि तांदूळ मिळत आहे, साखर, दुध, डाळ, मसाले यांची विक्री करणारे आता आम्हाला उधारीवर काहीही देत नाहीत. तसंच लॉकडाउन वाढत चालला आहे. पण कुठे नोकरीही मिळत नाही, असं भानू गुप्ता यांनी पत्रात नमूद केलंय.

 

ट्रेंडिंग बातम्या-

पुणे महापौरांच्या पायाला भिंगरी, कंटेन्मेंट भागात प्रत्यक्ष भेटी देऊन उपाययोजनांचे नियोजन!

…म्हणून सोलापूर महापालिका आयुक्त दिपक तावरे यांची बदली, त्यांच्या जागी या अधिकाऱ्याची वर्णी

महत्वाच्या बातम्या-

“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…

“मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या